Petrol Diesel Price Hike: महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आज पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता चार आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज, १९ मे पासून पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटर ९१ पैशांनी महागले आहे. तर डिझेल प्रति लिटर ९४ पैशांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या प्रचंड तणावाचा थेट परिणाम आता भारतीयांच्या खिशावर होऊ लागला आहे. देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ झाली आहे. त्यानुसार दिल्लीत पेट्रोलच्या दरात 87 पैसे आणि डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107 रुपयांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. तर डिझेल प्रतिलीटर 94 रुपयांच्या टप्प्याजवळ येऊन पोहोचले आहे. मंगळवारी सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. Petrol Diesel Price Hike पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर दिल्लीत पेट्रोल ८७ पैशांनी महाग झाले असून ते ९८.६४ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. डिझेलच्या दरातही ९१ पैशांची वाढ झाली असून ९१.५८ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोल ९१ पैशांनी वाढून १०७.५९ रुपये प्रति लिटर झाले आहे, डिझेल ९४ पैशांनी वाढून ९४.०८ रुपये प्रति लिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलमध्ये सर्वाधिक ९६ पैशांची वाढ झाली असून ते १०९.७० रुपये प्रति लिटर झाले आहे. डिझेल ९४ पैशांनी वाढून ९६.०७ रुपये प्रति लिटर झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ८२ पैशांनी महाग होऊन १०४.४९ रुपये प्रति लिटर झाले आहे डिझेल ८६ पैशांनी वाढून ९६.११ रुपये प्रति लिटर झाले आहे. अग्रलेख : अचंबित करणारे वक्तव्य