तीन दिवसानंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढ ; वाचा आजचे भाव

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरून एकीकडे देशात सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. तर दुसरीकडे इंधन दरवाढ काही केल्या कमी होताना दिसत नाही. रोज पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतच जात आहेत. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत.

गेल्या आठवड्यात अनेकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठल्याही प्रकारचे बदल झालेले नव्हते. मात्र, आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे

शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. दिल्लीत आज पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

दिल्लीत पेट्रोलचे दर 91.17 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. तर डिझेलचे दर वाढून 81.47 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. तर मुंबईतील पेट्रोलचे दर 13 पैशांनी वाढून प्रतिलिटर 97.47 रुपये झाली आहे. तर डिझेलचे दर वाढून 88.60 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.