मुंबई – देशासह महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. साडेचार महिने तेलाच्या किंमती स्थिर ठेवल्यामुळे जो तोटा सहन करावा लागला, त्याची किंमत तेल कंपन्या आता दररोज दर वाढवून सर्वसामान्यांकडून वसूल करत आहेत. जेव्हा-जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे किती भडका निर्माण झाला आहे ते…
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर
अकोला – पेट्रोल १२०.१९ रुपये / डिझेल १०२.९२ रुपये
पुणे – पेट्रोल १२०.३५ रुपये / डिझेल १०३.०४ रुपये
अमरावती – पेट्रोल १२१.१९ रुपये / डिझेल १०३.८८ रुपये
औरंगाबाद – पेट्रोल १२२.१३ रुपये / डिझेल १०६.३८ रुपये
धुळे – पेट्रोल १२०.१८ रुपये / डिझेल १०२.८९ रुपये
नागपूर – पेट्रोल १२०.१६ रुपये / डिझेल १०२.९० रुपये
मुंबई शहर – पेट्रोल १२०.५१ रुपये / डिझेल १०४.७७ रुपये
रायगड – पेट्रोल १२०.३४ रुपये / डिझेल १०३.०१ रुपये
रत्नागिरी – पेट्रोल १२१.३७ रुपये / डिझेल १०४.४३ रुपये
सातारा – पेट्रोल १२१.१२ रुपये / डिझेल १०३.७८ रुपये
सिंधुदुर्ग – पेट्रोल १२२.०६ रुपये / डिझेल १०४.७२ रुपये
सोलापूर – पेट्रोल १२०.२१ रुपये / डिझेल १०२.९२ रुपये
ठाणे – पेट्रोल १२०.१० रुपये / डिझेल १०२.७८ रुपये