टोकियो – युक्रेनमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमतीत सोमवारी 10 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक वाढ झाली. सोमवारी बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव 10 डॉलरपेक्षा अधिक वाढून ते सुमारे 130 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. त्यामुळे जगातील एकूणच तेलाच्या किंमती वाढणार आहेत.
भारतालाही याचा मोठा फटका बसणार असून भारतातील इंधनाचे दर आता कोणत्याही क्षणी कितीही वाढू शकतात असे संकेत मिळाले आहेत. गेली सुमारे आठ वर्षे कच्चा तेलाचे दर कमालीचे खाली आले होते. एका टप्प्यात तर हे दर जेमतेम 22 डॉलर्स पर्यंत खाली आले होते.
कित्तेक दिवस ते चाळीस ते पन्नास डॉलर्सच्या पातळीवर स्थीर होते. पण आता हे दर त्यांच्या पुर्वीच्या मुळ किंमतीच्या पातळीवर जाऊ लागले आहेत. कच्चा तेलाचा आजवरचा सर्वात अधिक दर 147 डॉलर्स प्रति बॅरल इतका होता.