नवी दिल्ली – मोदी सरकारने कच्च्या तेलावरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.
पेट्रोल और डीजल पर उत्पाद शुल्क(Excise duty) में 3 रुपये प्रति लीटर की बढ़त हुई। pic.twitter.com/iAJLENRGhP
— ANI_HindiNews (@AHindinews) March 14, 2020
कोरोना व्हायरस आणि अमेरिका-रशियामध्ये अधिक तेल उत्पादन करण्याची स्पर्धा लागली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाचे भाव कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने कमी होत आहे. अशातच मोदी सरकारने कच्च्या तेलावरील उत्पादन शुल्कात तीन रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.
दरम्यान, मागील सव्वादोन महिन्यांत पेट्रोल ५ रुपयांनी कमी झाले आहे. २७ फेब्रुवारीपासून ही घट सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ३० टकक्यांनी कमी झाले आहेत.