पेट्रोल आणि डिझेल चोरणारी टोळी जेरबंद

लोणी काळभोर – पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने राज्यात पेट्रोल आणि डिझेल चोरी करणाऱ्या टोळीकडून तब्बल 19 गुन्हे उघडकीस आणले असून वरील गुन्ह्यात साडेसत्तेचाळीस लाख रुपयांचे सुमारे 47 हजार 774 लिटर डिझेल चोरीस गेले असल्याचे समोर आले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले, इंदापूर येथील पेट्रोल पंपाच्या टाकीतील 10 हजार लिटर डिझेल चोरी गेले होते. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, अनिल काळे, रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, विजय कांचन, अभिजित एकशिंगे, राजू मोमीन, धीरज जाधव  हे करीत होते.

सदरच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर रेकॉर्डवरील आरोपी यांचा माग काढत ३ दिवसांपूर्वी कुख्यात लाला काळेच्या टोळीतील ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले होते. या आरोपींना बारामती न्यायालयाने ७ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. सदरच्या आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने वरील पथकाने आरोपी योग्य तपास करून पुणे जिल्ह्यातील ३ गुन्हे, सोलापूर जिल्ह्यातील १२ गुन्हे, सातारा जिल्ह्यातील २ गुन्हे आणि जळगाव जिल्ह्यातील २ गुन्हे उघडकीस आणण्यास पुणे ग्रामिण च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकास आले आहे. सदरचे आरोपी हे रेकॉर्ड वरील असल्याने यांच्यावर या आधी देखील तब्बल 15 ते 20 गुन्हे राज्य भरात दाखल आहेत.

हे आरोपी अगोदर ज्या ठिकाणी चोरी करायची आहे त्या ठिकाणी मोटार सायकल वर जाऊन फिरून रेकी करत असत. जे पेट्रोल पंप हायवे रोड सोडून तसेच गावापासून लांब असणारे पंप टार्गेट करीत होते. मोटार सायकल वरून रेकी केल्याने त्यांना सर्व लहान मोठे रस्ते माहिती होत होते. त्यामुळे ते आपले चोरीचे काम उरकून योग्य ठरलेल्या रस्त्याने जात असत. काही ठिकाणी वीजेच्या मोटारीचा देखील डिझेल चोरी साठी उपयोग केला असल्याचे आरोपी सांगत आहेत. तसेच जुनी सायफन पद्धत देखील वापरत होते. सदरच्या टोळीने राज्य भरात या पद्धतीचे गुन्हे करून लाखो रुपयांचे डिझेल चोरले होते.

टोळी ही पुणे ग्रामिण पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने जेरबंद करून राज्यात डिझेल चोरी च्या गुन्ह्यांना आळा घातला आहे. सदरची टोळी पकडली गेल्यामुळे पेट्रोल पंप मालक यांनी पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांचे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे आभार  मानले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.