पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा भडकले!

नवी दिल्ली – कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत चार डाॅलरने वाढली आहे. त्याची झळ आता भारतात देखील बसत असून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

आज दिल्ली मध्ये पेट्रोल 22 पैसे प्रति लीटर तर डिझेल 28 पैसे प्रति लीटर दराने महाग झाले आहे. दिल्ली मध्ये पहिल्यांदा डिझेल दर 70 रूपयांच्या पलीकडे पोहचला आहे. दिल्लीमध्ये एक लीटर डिझेल विक्री 70.21 रूपयाने होत आहे, तर पेट्रोलचा प्रती लीटर दर 78.52 रूपये असा आहे. मागील एका महिन्यात दिल्लीमध्ये पेट्रोल 2.27 रूपये प्रति लीटर तर डिझेल 2.46 रूपये प्रती लीटर ने महाग झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लीटर  85.93 रूपये तर डिझेलचा दर 74.54 रूपये इतका झाला आहे. तसेच कोलकत्ता मध्ये पेट्रोल प्रती लीटर दर 81.44 रूपये आणि डिझेल प्रती लीटर दर 73.06 रूपये असा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल प्रती लीटर दर 81.58 तर डिझेल प्रती लीटर दर 74.54 रूपयांवर पोहचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)