निकालाच्या तोंडावर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

मुंबई-  2019 लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अवघे दोन दिवस उरले आहे. आणि त्यातच आज शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरात एक लिटर पेट्रोलचा दर 76.73 रुपयांवर पोहचला, तर डिझेलने 69.27 रुपयांचा दर गाठला. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

गेल्या दहा दिवसात पेट्रोलचे दर 1.80 रुपयांनी तर, डिझेलचे दर 63 पैशांनी कमी झाले होते. परंतु निकालाचा दिवस समीप येताच मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होण्याची चिन्हं आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीचा परिणाम देशातील इंधन दरावर होणार आहे. त्यामुळे ही पेट्रोल-डिझेलची वाढ सामान्य नागरिकांना कितपत परवडेल हे पाहणे गरजेचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)