नवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे. सध्या पेट्रोलची किंमत ८७ रुपयांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमतही ८० रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. रविवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलमध्ये ३५ पैसे आणि डिझेलमध्ये ६० पैसे प्रतिलिटर वाढ केली.
गेल्या १५ दिवसांत पेट्रोल ७.९ रुपयांनी महागले आहे, तर डिझेलच्या दरातही लिटरमागे ८.८८ रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीतील पेट्रोलची किंमत काल ७८.८८ रुपयांवरून वाढून ७९.२३ रुपये झाली आहे, जी महाग आहे. त्याचप्रमाणे डिझेलची किंमत ७७.६७ रुपयांवरून ७८.२७ रुपये प्रतिलिटर झाली आहे, जे कालच्या तुलनेत ६० पैसे अधिक महाग आहे.