पणजी – गोवा राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील व्हॅट मध्ये वाढ केल्याने तेथील पेट्रेल 20 टक्के आणि डिझेल 15 टक्क्याने आज (शुक्रवार) रात्री 12 वाजल्यापासुन महागले आहे. वित्त विभागाच्या अव्वर सचिव सुश्मा कारत यांनी दिलेल्या माहिती मध्ये सांगितले आहे की, राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅटमध्ये वाढ केली असुन त्यामुळे शनिवार दि. 15 पासुन पेट्रोल 2 रुपये 70 पैसे आणि डिझेल 1 रुपये आणि 43 पैशाने महागणार आहे.
तर, देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने गेल्या पाच महिन्यातील निचांक गाठला आहे. या घसरणीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 70.18 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. तर डिझेलचा दर 64.17 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे.
यापूर्वी दिल्लीमध्ये 14 जानेवारी 2019 रोजी पेट्रोलचा दर 70.13 रुपये प्रति लिटर इतका होता. तर 13 जानेवारी 2019 रोजी दिल्लीत डिझेलचा दर 63.69 रुपये प्रति लिटर इतका होता. दिल्लीमध्ये 14 जानेवारी रोजी डिझेलचा दर 64.18 रुपये प्रति लिटर इतका होता.