पेट्रोल आणि डिझेल आणखी 25 पैशांनी महागले

नवी दिल्ली, दि.13 -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी 5 दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ केली. त्यामुळे बुधवारी दोन्ही इंधने लिटरमागे आणखी 25 पैशांनी महागली.

आता देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दराने (84 रूपये 45 पैसे) नवा उच्चांक गाठला आहे. दिल्लीत डिझेलचा दर 74 रूपये 63 पैसे इतका झाला आहे. मुंबईत पेट्रोल दराने 91 रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत डिझेलच्या दराची (81 रूपये 34 पैसे) उच्चांकी नोंद झाली आहे. सुमारे महिनाभराच्या विश्रामानंतर सार्वजनिक कंपन्यांनी 6 जानेवारीपासून दैनंदिन दरबदल सुरू केला. तेव्हापासून तीनवेळा दरवाढ झाली आहे. त्या दरवाढींमध्ये मिळून पेट्रोल 74 पैशांनी, तर डिझेल 76 पैशांनी महागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.