इम्रान खान यांच्या भाच्याच्या जामिनाविरोधात याचिका

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे भाचे ऍड. हुसैन नियाझी यांच्यसह अन्य 7 जणांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी पंजाब सरकारने लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. “पंजाब इन्स्टिट्युट ऑफ कार्डिओलॉजी’वरील हल्ल्याप्रकरणी ऍड. नियाझी आणि अन्य 7 जणांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायालयाने घाईघाईने जामीन मंजूर केला आहे, असे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.

सुमारे 200 वकिलांनी 11 डिसेंबरला पंजाब इन्स्टिट्युट ऑफ कार्डिऑलॉजीमध्ये घुसून डॉक्‍टरांना मारहाण केली होती. तसेच हॉस्पिटलच्या मालमत्तेचे नुकसान केले होते आणि वाहनांचीही तोडफोड केली होती. या वकिलांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या वाहनाला आगही लावली होती. या हल्ल्यादरम्यान ऑक्‍सिजन हटवला गेल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला होता.

पोलिसांनी या हल्ल्याबद्दल 250 जणांच्याविरोधात “एफआयआर’दाखल केली होती आणि 52 वकिलांना अटक करण्यात आली होती. हल्ल्यात नियाझी यांचा सहभाग असल्याचे फोटो, व्हिडीओही प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या अटकेचे प्रयत्न झाले होते. पण त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवला होता.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.