पेठ (प्रतिनिधी) : पेठ तालुका आंबेगाव येथील मंगळवारी (१४ एप्रिल २०२०) रोजी होणारा श्री मुक्तादेवी यात्रा उत्सव करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदेशानुसार कलम 144 लागू असल्याने रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी मित्र, नातेवाईकांना आमंत्रित करू नये. गावाबाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.
संपूर्ण गावाच्या वतीने देवीचे पुजारी त्यांच्या सोबत एक व्यक्ती व ब्राह्मण इत्यादिनी मंदिरात रिती रिवाजा प्रमाणे देवीची पूजा करणे, नैवेद्य अर्पण करणे, नारळ फोडणे इत्यादी कार्ये करतील व नंतर मंदीर बंद केले जाईल. बाकी सर्व नागरिकांनी देवीला नैवद्य अर्पण करणे, नारळ फोडणे घरातील देव्हा-या समोरूनच करायचे आहे. कोणत्याही प्रकारे पालखी, काठी पूजा व मिरवणूक होणार नसल्याने कोठेही एकत्र येऊन जमाव करू नये आणि कोणीही गावात इतरत्र फिरू नये.
वरील नियमांचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस कारवाई होऊ शकते. यासाठी सर्वांना विनंती करण्यात आली आहे की या वर्षी घरातूनच श्री मुक्तादेवी मातेला प्रार्थना करू करून “करोना चा नायनाट होवो, करोना आपल्या देशांतून हद्दपार होवो.” पुढच्या वर्षी यात्रा जोरात करता येईल. आपल्या आरोग्याची सर्वांनी काळजी घ्यावी. असे आवाहन वाकेश्वर देवस्थान ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ पेठ, आणि पेठ ग्रामपंचायतीतर्फे सर्व नागरिकांना करण्यात आलेले आहे.