पेठ (ता आंबेगाव) येथील पाहिले कोरोना बाधित पतीपत्नी व आज उर्वरित 4 कोरोना बाधित या सर्व सहाही व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पेठ ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला व आपले गाव कोरोना मुक्त झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
आंबेगाव तालुक्याचे प्रवेश द्वार आहे व सातगाव पठार भागाची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठमध्ये पति-पत्नी रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु असतानाच मुंबईहून गावी आलेल्या चार व्यक्ती कोरोना बाधित निघाल्या. त्यामुळे पेठ गावात एकूण 6 रुग्ण पॉझिटिव्ह झाले होते.
या सर्वांची 14 दिवसांनी तपासणी केली असता सर्व 6 रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पेठ गाव करोना मुक्त झाले असून नागरिकांच्या चिंता काहीशी कमी झाली आहे. असं असलं तरी कुटुंब सर्वेक्षण सुरू ठेवणार असल्याचे उपसरपंच अनिल सणस, माजी उपसरपंच संतोष धुमाळ ,अशोक राक्षे ग्रामसेवक चौगुले लोक यांनी सांगितले. 12 जून पर्यंतचे लॉक डाऊन काहीसे शिथिल कारण्यात आले आहे.
पेठ परिसरात जरी लॉक डाऊन काहीसे शिथिल केले असले तरी लोकांनी सोशल डिस्टन्स पाळावे, मास्क वापरावे व विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन गाव कामगार तलाठी हेमंत भागवत यांनी सांगितले.