ग्रॅमी पुरस्कार विजेता पीटर डिंक्लेज घेऊन येणार रम्पेलस्टिल्त्स्किन परीकथा

लॉस अँजेलिस : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेत टायरिन लॅनिस्टर या आपल्या जबरदस्त भूमिकेमुळे अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला पीटर डिंक्लेज हा आपल्याला नवीन भूमिकेत दिसणार आहे. तो आपणाला नवीन चित्रपटात दिसणार आहे आणि त्याच्या तो निर्माता देखील असणार आहे.

‘रम्पेलस्टिल्त्स्किन’ असे या चित्रपटाचे नाव असून हा याच नावाच्या परिकथेवर आधारित चित्रपट आहे. पीटर या चित्रपटतात एका खुज्या मायावी व्यक्तीची भूमिका निभावू शकतात. सध्या ‘गेम ऑफ थ्रोन्स ‘या मालिकेचा शेवटचा सीजन प्रेक्षकांसमोर येणार आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीतील पुढील पाऊल म्हणून पीटर या प्रोजेक्टकडे पाहत आहे.

पेट्रीक नास हे या चित्रपटाच्या कथेवर लिखाणाचे काम करत असून हा प्रोजेक्ट सोनी वाहिनीचा असेल.पीटर आणि  डेव्हिड गिन्सबर्ग हे त्यांच्या इस्टुरी या बॅनरच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)