ज्याने काळाची पावले ओळखली त्याला जगाची ओळख झाली असे मानले जाते.याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. राजेंद्र डिंबळे व डॉ सविता डिंबळे यांचे सहकारी डॉ. सागर पाठक व डॉ नेहा पाठक या पती-पत्नीने खांद्याला खांदा लावून वैदयकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत स्वीकारले. नसरापूर येथे एका लहानशा जागेत सुरू झालेला प्रवास ते सर्व आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा सिद्धिविनायक हॉस्पिटल ऍन्ड रिसर्च सेंटरचा वटवृक्षात झालेले रूपांतर हा प्रवास विस्मयकारक आजच्या तरूणांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भोर-वेल्हा तालुका डोंगरी व दुर्गम असून वैद्यकीय सेवेसाठीे पुणे शहरावर अवलंबून होता. ही उणीव दूर करण्यासाठी आणि भागातील नागरीकांना उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा स्थानिक ठिकाणीच अत्यंत कमी खर्चात मिळाली पाहीजे, असा दृढ निश्चय डॉ. राजेंद्र डिंबळे यांनी केला आणि ते पुणे शहरातून नसरापूर येथे सन 2001 ला आले. शिवरे ता.भोर गावचे शेतकरी कुटूंबातील कोणतीही वैद्यकीय सेवेची पार्श्वभुमी नसलेले डॉ. राजेंद्र संपतराव डिंबळे यांनी नसरापूर येथे सिद्धिविनायक हॉस्पिटल ऍन्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेला सुरुवात केली.
रूग्णांना ऍडमीट करणे वैद्यकीय साधनांचा अभाव उच्च दर्जाची उपकरणे नसणे त्यामुळे गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करणे शक्य होत नव्हते, याची खंत त्यांना सतत वाटत होती. आर्थिक अडचणी असतानाही बॅंका व पतसंस्थेच्या माध्यमातून कर्जाची उभारणी करून नसरापूर ता. भोर येथे चेलाडी वेल्हा मार्गावर प्रशस्तजागेत रुग्णालय उभारले. गेल्या 20 वर्षापासून 24 तास अविरत वैद्यकीय सेवा पुरवत आहे. पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातातल्या हजारो लोकांचा जीव वाचवण्याचे काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेले आहे. कोठेही अपघात झाला तर काही मिनिटातच हॉस्पिटलची ऍम्बुलन्स हजर होत असे.
उपलब्ध सेवा…
100 बेडचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 24 तास अत्यवश्यक सेवा अत्याधुनिक सुसज्ज अतिदक्षता विभाग मेडिसीन हृदयरोग व मधुमेह चिकित्सा तीन सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स क़ृत्रिम श्वसन यंत्र ट्रॉमा केअर सेंटर ज़ॉईंट रिप्लेसमेंट व्हेस्क्युलर सर्जरी दुर्बिणीतून सांध्यांची तपासणी व शस्त्रक्रिया स्पोर्टस मेडीसीन सी आर्म स्पाईन मेंदूरोग चिकित्सा व शस्त्रक्रिया क़ॅन्सर निदान शस्त्रक्रिया व उपचार मुत्ररोग दुर्बिणीतून मूतखडा फोडण्याची सोय प्लॅस्टिक व कॉस्मेटिक सर्जरी लॅप्रोस्कोपी (दुर्बिणीव्दारे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया)वेदनारहीत प्रसुति क़ान नाक व घसा शस्त्रक्रिया विभाग ऩेत्रविभाग आयुर्वेद व पंचकर्म सेंटर फ़िजीओथेरपी विभाग ज़नरल सेमीस्पेशल डिलक्स रूम मेडीक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. ईसीजी सीटीस्कॅन ड़िजीटल एक्स रे, सोनोग्राफी स्ट्रेस सेंटर 2 डी इको व कलर ड्रॉप्लर पॅथॉलॉजी लॅबरोटरी मेडीकल स्टोअर 24 तास कार्डीक ऍम्बुलन्स सेवा.
सध्याचे जे 100 खाटांचे रुग्णालय उभे आहे, त्यामागे परिश्रम व त्यागही आहे. आज सुमारे 95 कर्मचारी हे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. निरनिराळ्या स्पेशलायझेशनचे कन्सल्टिंग डॉक्टर्स येथे सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने सर्व जण सेवाकार्य म्हणूनच येथे काम करीत आहेत. मेडिकल स्टोअर्सही प्रशस्त असून रूग्णांना कमी खर्चात दर्जेदार औषधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचा लाभ इतर ठिकाणी उपचार घेत असलेले रुग्णही घेत आहेत.नसरापूर रुग्णालायाचे 12000 स्केअर फुट इन्फ्रास्ट्रक्चर, प्रशस्त इमारत, मुबलक जल साठा आहे.
दुसरी शाखा वेळू ता.भोर येथे सन 2018 मध्ये सुरू केली. तेथेही नसरापूरप्रमाणेच सर्व सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. अगदी अशिक्षित लोकांनाही समजेल अश्या स्वरूपात माहिती फलक लावून रुग्णाच्या नातेवाईकाना पेशंटची माहिती दिली जाते. सर्वसामान्य माणसाला समजतील अशा व्यवहार्य कल्पना राबवण्यात आल्या आहेत. प्रत्येक वैद्यकिय विभागाची ओपीडी, आयपीडी, ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग हा आखला गेला आहे. तसेच मेजर ऑपरेशन थिएटर, मध्यवर्ती आयसीयु, विभाग परिपूर्ण आहेत. क्वालिटीचा प्रत्येक ठिकाणी विचार केला आहे. सर्व मेडिकल इक्विपमेंटस् हे स्टॅन्डर्ड कंपनीचे व त्यातील उच्चतर मॉडेल्स आहेत. कमी खर्चात सेवा देणार असले तरी त्यात क्वालिटी कॉम्प्रमाईज कोठेही आढळत नाही. इतर कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोडीस तोडच सर्व काही दिसेल. इतर कोठेच न दिसणारी अजून एक गोष्ट म्हणजे सेवावृत्ती. याठिकाणी अनेक सेवानिवृत्त सेवा देत आहेत.
लोकांना मार्गदर्शन करण, त्यांना आजारानुसार त्यासंबंधी विभागात नेऊन डॉक्टरांची अपॉईंटमेंट मिळवून देणे, ब्लड अथवा औषधे आणून देण्यासाठी मदत करणे, रुग्णांची आपुलकीने रोज विचारपूस करुन त्यांना हिंमत देणे, नातेवाइकांशी आस्थेवाईकपणे बोलणे, प्रसंगी सांत्वन करणे, अशी अनेक कामे या सेवावृत्ती ने कोठल्याही मानधनाशिवाय रोज अविरत करतात. इतक्या सर्व सोयीसुविधा द्यायच्या व ते सुद्धा अत्यल्प खर्चात. याचा सर्व लेखाजोखा येथील प्रशासक अगदी कायदेशीर व चोख ठेवतात. ज्या रुग्णांचे आजार शासकिय जीवनदायी योजनेत अंतर्भूत होत नाहीत, त्यांच्यासाठी सेवाभावी ट्रस्ट मार्फत मदत केली जाते.
(संकलन : बाळू शिंदे, कापूरहोळ) डॉ. राजेंद्र डिंबळे