दोनशे झाडे तोडण्यास मान्यता

पिंपरी – महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या रस्ते रूंदीकरण कामासह खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पासाठी आणि नागरिकांच्या अर्जानुसार शहराभरातील एकूण 200 झाडे तोडण्यात येणार आहे. त्यास वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली आहे.

समितीच्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसेवक शीतल शिंदे, भाऊसाहेब भोईर, शाम लांडे, संतोष लोंढे, सदस्य संभाजी बारणे, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते. पालिकेच्या रस्ते रूंदीकरणास अडथळा ठरणारी झाडे तोडण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव होता. त्यावर शीतल शिंदे व शाम लांडे यांनी आक्षेप घेतला.

स्थापत्य विभाग निविदा राबविते. त्यासाठी नेमलेल्या आर्किटेक्‍टने किती झाडे वाचविता येतील, याचा अभ्यास केला आहे का. ती आकडेवारी समितीसमोर का सादर केली जात नाही. पुढील सभेत स्थापत्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित राहावेत, अशी सूचना सदस्यांनी केली. तसेच, झाडे तोडण्यावरून स्थापत्य व उद्यान विभागाच्या घाई-गडबडीवर सदस्यांनी टीका केली. वृक्ष संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घ्यावी. शहरातील कलाकारांची मदत घेऊन पथनाट्य, गाणे आदी माध्यमातून प्रबोधन करावे, असा सदस्य प्रस्ताव समितीने मंजूर केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.