नवी दिल्ली – भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिच्यासह तिचे वैयक्तिक प्रशिक्षक वुलर अकोस तसेच सहकारी प्रियांका फोगट आणि फिजियोथेरपिस्ट पूर्णिमा रामन यांच्या हंगेरी आणि पोलंडमधील 40 दिवसांच्या प्रशिक्षणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली.
टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेंतर्गत या शिबिराला मान्यता देण्यात आली आहे. हंगेरीतील बुडापेस्ट तसेच पोलंड येथील ऑलिम्पिक सराव केंद्रात 5 फेब्रुवारीपर्यंत हे शिबिर रंगणार आहे. भत्ता म्हणून एकूण 15.51 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.