राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्यास परवानगी

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्यास परवानगी दिली आहे. परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या उमेदवारांनाच केंद्र बदलता येणार असून दि.17 ते 19 ऑगस्टदरम्यान ऑनलाइन पद्धतीने हा बदल करता येणार आहे.

आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा दि.20 सप्टेंबरला घेतली जाणार आहे. पुण्यात राहून परीक्षेची तयारी करणारे असंख्य उमेदवार आपापल्या गावी गेले आहेत. मात्र, परीक्षेसाठी त्यांना पुण्यात यावे लागणार होते. सध्याच्या करोना संसर्गाच्या काळात लांबचा प्रवास करावा लागू नये यासाठी उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून केंद्र बदलण्यास मुभा देण्याची मागणी आयोगाकडे केली होती. त्यानंतर उमेदवारांच्या सुरक्षेचा विचार करून आयोगाने केंद्र बदलण्याची परवानगी दिली आहे. त्याबाबतचे परिपत्रक आयोगाने प्रसिद्ध केले आहे.

ज्या उमेदवारांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडले आहे, त्यांना केंद्र बदलण्याची मुभा आयोगाने दिली आहे. केंद्र बदलणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या महसुली विभागाच्या मुख्यालयाचे केंद्र परीक्षा केंद्र (मुंबई, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर) म्हणून निवडता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार केंद्र बदलण्याची मुभा असेल. केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यानंतर त्या केंद्राची निवड उमेदवारांना करता येणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.