नवी दिल्ली – भारतातील नाकावाटे घेण्याच्या पहिल्या करोनावरील लसीच्या पुढील चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. ती लस भारत बायोटेक कंपनीकडून विकसित केली जात आहे.नाकावाटे घेण्याच्या बीबीव्ही154 या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली.
ती 18 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिकांवर घेण्यात आली. आता त्या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ती लस उपलब्ध झाल्यानंतर भारत बायोटेकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल.
त्या कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीचे डोस आधीपासूनच देशात दिले जात आहेत. आता ती कंपनी वॉशिंग्टन विद्यापीठाच्या परवानाधारक तंत्रज्ञानाच्या आधारे नाकावाटे दिली जाणारी लस विकसित करत आहे.