38 कोटींच्या विकासकामांना स्थायीची मंजुरी

औषध खरेदीसह स्वच्छ सर्वेक्षण, देखभाल व दुरुस्तीसाठी खर्च

पिंपरी – महापालिकेच्या आरोग्य विभागास आवश्‍यक असलेल्या औषध खरेदीसाठी येणाऱ्या 28 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली. याव्यतिरिक्त विविध विकासकामांसाठी येणाऱ्या 37 कोटी 75 लाख इतक्‍या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समितीची सभा गुरुवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. शिक्षण विभागाच्या बालवाड्यांसाठी स्कूल डेस्क खरेदीसाठी 1 कोटी 86 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 2 जाधववाडीमधील गट क्रमांक 539 विकसित करण्यासाठी 11 कोटी 96 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. 2 ऑक्‍टोबर 2020 पासून संपूर्ण देशभर केंद्र सरकारच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती तसेच प्रचार व प्रसार होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी येणाऱ्या 1 कोटी 53 लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

क्रीडा विभागास विविध व्यायाम शाळांकरिता आवश्‍यक साहित्य खरेदीसाठी 1 कोटी 21 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली. “ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 3 मधील ड्रेनेज लाईन व चेंबर्सची वार्षिक दुरुस्ती करण्यासाठी 40 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यालाही मान्यता देण्यात आली. सेक्‍टर 23 पंपहाऊसला पंपिग मशिनरीचे व डिझेल जनरेटरचे देखभाल दुरुस्ती करण्यासाठी 37 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.

चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्रमांक 3 मधील भागात मलनिसारणची कामे करण्यासाठी 50 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. “क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नाल्यातील अस्तित्वात असलेली ड्रेनेज लाईन रस्त्यावर स्थलांतरित करण्यासाठी येणाऱ्या 76 लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील भोसरी आळंदी रस्ता सुशोभीकरण व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या 64 लाख रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 8 येथे जलनिसारण नलिका टाकणे व दुरुस्ती करण्यासाठी 91 लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 27 रहाटणी येथील तापकीर चौक ते तापकीर मळा चौक परिसरातील जलनिसारण व्यवस्था सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या 61 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्रमांक 8 मधील सेक्‍टर नंबर 4 व 6 भागात आवश्‍यकतेनुसार नविन लाईन टाकण्यासाठी 27 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 21 पिंपरीमधील तपोवन मंदिर परिसर, वैभवनगर, झुलेलाल घाट परिसर, डिलक्‍स चौक परिसर व इतर परिसरातील जलनिसारण व्यवस्था सुधारणा करण्यासाठी 83 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 32 मध्ये सुआशी हॉटेल गल्ली, शिवाजी पार्क व उर्वरित परिसरात जलनिसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या 46 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

शिवशाहू शंभो उद्यानातील मोकळ्या जागेत जिम्गेशियम हॉल बांधणे व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 2 कोटी 39 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. नव्याने बांधण्यात येणाऱ्या थेरगाव व चिंचवड येथील तालेरा रुग्णालय इमारतीसाठी आवश्‍यक त्या क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटी 67 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.