-->

एकिकडे कोरोना तर दुसरीकडे पाऊस, शेतकऱ्यांनी काय करायचं?

इंदापूर (डिकसळ)-अवकाळी पावसाने अचानकपणे हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

गव्हाच्या पीकाचं मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे, तसेच मका, द्राक्ष या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने इंदापूर तालुक्यातील पोंधवडी, कळस, शेटफळगडे,काझड,भिगवण, बोरी, डिकसळ भागातील शेतकऱ्यावर संकट कोसळलं आहे

दरम्यान, एकीकडे कोरोनाचं संकट असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्याला संकटात टाकलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.