राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचा मित्रपक्ष म्हणून राजकारणात सक्रिय असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संभाव्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे. यावर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन प्रमुख पक्ष काय निर्णय घेतात, हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचे आहे.
“प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टी
गेल्या 20 वर्षांपासून आपल्या मित्रपक्षांशी कायमच प्रामाणिक राहून कार्य करत आहे. येत्या विधानसभेत प्रा.जोगेंद्र कवाडे, कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या आदेशानुसार ही उमेदवारी मागत आहे,’ असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तर उमेदवारी न दिल्यास मित्र पक्षांशी बंडखोरी करुन संभाव्य उमेदवार अपक्ष उमेदवारी करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील क्षेत्रे यांनी दिला.