ऐतिहासिक दसरा मेळावासाठी जनाची मनाची काढली जाते?

मुंबई : आज विजयादशमी दसरा. या दिवशी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे लक्ष लागून असते. आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

गेल्या अनेक दिवसांचा राहिलेला हिशोब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चुकता करणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात ठाकरेंच्या भात्यातले बाण कुणाकुणावर चालणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले उद्धव ठाकरे शिवसैनिकांना दसरा मेळाव्याला संबोधणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर  संजय राऊत यांनी वृत्त माध्यमांशी बोलतांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीका टिप्पणीला उत्तर दिले आहे. 

काय म्हणाले संजय राऊत 

जसा २०१९ चा दसरा मेळावा हा आमच्यासाठी महत्वाचा होता. कारण, विधानसभा निवडणुका आम्हाला समोर दिसत होत्या आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात विधानसभेवर केवळ भगवाच फडकवायचा नाहीतर, पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, हा विचार डोक्यात ठेवून आम्ही दसरा मेळावा झाला होता. मात्र  बिहारमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी, मतांसाठी लाखोंचे मेळावे चालतात. पण महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक दसरा मेळावासाठी जनाची मनाची काढली जाते? ठीक आहे, जनाची मनाची आहे, म्हणूनच हा मेळावा शिवतीर्थाच्या बाजूच्या वीर सावरकर सभागृहात आम्ही घेत आहोत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.