पुणे : “लोकनेते शरद पवार हे खऱ्या अर्थाने असामान्य योद्धे “

कामगार व उत्पादन शुल्क मंत्री वळसे पाटील यांचे प्रतिपादन

हडपसर (प्रतिनिधी) – वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असा त्रिवेणी संगम लाभलेले शरद पवार हे लोकनेते आहेत. राष्ट्रीय पातळीवरील अनुभव आणि कृषी, उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण व सहकार क्षेत्राची त्यांना खडान्‌खडा माहिती आहे. शरद पवार खऱ्या अर्थाने असामान्य योद्धे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी केले.

“लोकनेते शरदरावजी पवारसाहेब’ यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या “ऑनलाइन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय योद्धा 80′ वक्तृत्व स्पर्धेच्या महात्मा फुले स्मारक, वानवडी येथील बक्षीस-वितरण समारंभात दिलीप वळसे पाटील बोलत होते.

या स्पर्धेत कराड येथील सदगुरू गाडगे महाराज कॉलेज मधील सुकन्या यादव मुलींतून प्रथम तर इंजिनिअरींग कॉलेज पुणे, मधील शुभम रंगराव पाटील हा मुलांतून प्रथम आला. तर सांघिक स्पर्धेत शरद रयत चषक एस. एम. जोशी कॉलेजच्या शुभम शेंडे व सिद्धेश कायगुडे या विद्यार्थांनी पटकावला. शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. भगीरथ शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे प्राचार्य डॉ.के.जी.कानडे, प्राचार्य डॉ.ए.डी.आंधळे, प्राचार्य डॉ.पांडूरंग गायकवाड, प्राचार्य डॉ.सी.जे.खिलारे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य चंद्रकांत वाव्हळ, प्राचार्य उत्तमराव आवारी, विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहविभागीय अधिकारी शंकर पवार, आजी-माजी रयत सेवक उपस्थित होते. प्रास्ताविक विभागीय चेअरमन ऍड. राम कांडगे यांनी केले. विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रतापराव गायकवाड आणि रूपाली सोनावळे यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.