लोकप्रतिनिधींना जनता घरचा रस्ता दाखविणार : लंके

शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शासकीय शिक्के काढू
राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेनिमित्त निंबळक चौकात सभेचे आयोजन

नगर – नगर – पारनेरच्या लोकप्रतिनिधींनी मतदार संघात पाणीप्रश्‍न व एमआयडीसी मध्ये उद्योग धंदे साठी विधानसभेत कधीच आवाज उठविला नाही. उपसभापदी पदाचा गैरवापर करुन, वृद्धाची संजय गांधी निराधर योजनेमधून मिळणारी पेंशन बंद करण्याचे काम त्यांनी केले. मात्र, या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना जनता या विधानसभेत घरचा रस्ता दाखवणार असल्याचा टोला निलेश लंके यांनी आ. विजय औटी याचे नाव न घेता लगावला.

नगर तालुक्‍यात पारनेर मतदारसंघातील खारेकर्जुने, इसळक, निंबळक, नवनागापूर, वडगाव गुफ्ता येथे राष्ट्रवादीचा जनसंवाद यात्रे निमित्त चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. या जनसंवाद यात्रेमध्ये डॉ. बबनराव डोंगरे, सुदाम सातपुते, लखण डोंगरे, लक्ष्मण गव्हाणे, राजेंद्र ढेपे, संजय चव्हाण , नितीन कोतकर, मा.पचायत समिती सदस्य माधवराव कोतकर, घनश्‍याम म्हस्के, हरीष कळसे, दादा झावरे, प्रशांत मदने, दत्ता कोतकर, संतोष जाजगे उपस्थित होते.

गेल्या चौदा दिवसापासून जनसंवाद यात्रा चालू आहे. या संवाद यात्रेतून लंके यानी वाड्या वस्त्यावरील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी लंके म्हणाले, परिसरात जवळच एमआयडीसी आहे. आठ-आठ दिवस पाणी सुटत नाही. वडगाव गुप्ता येथील शेतकऱ्याच्या जमिनीवर शासनाने शिक्के मारल्यामुळे शेतकऱ्याना जमिनीवर कर्ज काढता येत नाही. जमिनही विकता येत नाही. यासाठी शेतकऱ्याना रस्यावर उतारण्याची वेळ आली. दोनच माहिन्यात शेतकऱ्याच्या उतारा त्यावरील शासकीय शिक्के काढणार. बेरोजगारांना रोजगार मिळून देण्यार असल्याचे लंके यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×