परिवर्तनातूनच जनता पोचपावती देईल : मनोज घोरपडे

मसूर  – पाच वर्षात मी शासनाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे, निष्ठेने शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवल्या आहेत. अनेक गावात विकास कामे पोहचवली आहेत. त्यामुळे कोणी कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. मायबाप जनता काल, आज आणि उद्याही माझ्या पाठिंशी असून कराड उत्तरचा आमदार कोण हे जनता ठरवणार आहे, आजवर मी केलेल्या कार्याची पोचपावती कराड उत्तरमधील परिवर्तनातून जनताच देईल, असा विश्‍वास व्यक्त केला. मसूर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.

कराड उत्तर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार मनोजदादा घोरपडे यांची मसूर गटातील निगडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी, चिखली, किवळ, हणबरवाडी, खोडजाईवाडी,वाघेश्‍वर, यादववाडी, माळवाडी या गावात पदयात्रा व विराटजनसमुदायाच्या उपस्थितीत मसूर बाजारपटांगण झालेल्या विजय संकल्प सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना मनोजदादा घोरपडे म्हणाले, आज कराड उत्तर मतदार संघात बेरोजगारी, तासवडे एमआयडीसी, हणबरवाडी धरणवाडी, महिला उद्योग, तीर्थक्षेत्र विकास, गाव विकास आराखडा, गटनिहाय असणारी प्रलंबित विकास कामे या सारखी अनके कामे प्रलंबित असून ही कामे प्राधान्याने मार्गी लावण्यात येणार आहेत.

आज मतदार संघात विद्यमान आमदार हे त्याच्या वारसाचा विचार करून आपली लढाई लढत आहेत. आत्तापर्यंत 20 वर्षात हे साहेब झाले, आता त्यांच्या सुपूत्रला भविष्यातील आमदार करण्यासाठी अजून 5 वर्षे मागत आहेत, त्यामुळे यांना आत्ताच घरी बसवा नाहीत घराणेशाहीची परंपरा चालूच राहील. स्वत:ला यशवंत विचारसरणीचे मानणारे हे आमदार यांच्याकडे एक तरी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे का हे पहावे. मतदार संघात भाषण करताना हे जी.एस.टी. व शासनाच्या केद्रांतील निर्णयावर बोलतात. त्यांना माझे सांगणे आहे की स्वयंघोषित आमदार साहेब हे कराड उत्तरच्या विकास कामावर बोला. उगाचच लोकांची दिशाभूल करू नका.

4 वर्षात भाजप सरकारच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करताना अनके योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम केले असून जनतेला सर्व गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे आज सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळे जनता जिथे असते तिथे विजय असतो, त्यामुळे परिवर्तन निश्‍चित आहे, हे नक्की असे आवाहन मनोजदादा घोरपडे यांनी केले. यावेळी शिवसेच्या महिला पदाधिकारी, वर्णे गटातील राष्ट्रवादीचे नेते, जय मल्हार क्रांती संघटना, रासपा कराड उत्तर, बळीराजा शेतकरी संघटना, तसेच अनेक संघटना, ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी यावेळी मनोजदादांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला. यावेळी कार्यक्रमासाठी विभागातील नेते व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.