‘विराट-अनुष्काला मूल होईल तेव्हा तैमूरला लोक विसरतील’

बॉलिवूड अभिनेत्री करिना आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान याची लोकप्रियता सर्वांनाच ठाऊक आहे. तैमूरचा जन्म झाल्यापासून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तैमूर कसा पोशाख घालतो, तो कसा खेळतो, तो कसा खातो याबद्दल सतत बातम्या येत आहेत. तैमूरइतकी आतापर्यंत कोणत्याही स्टार किडने प्रसिद्धी मिळविली नाही. करिना कपूरची सासू शर्मिला टागोर एका चॅट शोमध्ये आली होती.

यावेळी शर्मिला टागोर यांनी म्हंटले कि, जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना मूल होईल तेव्हा लोक तैमूरला विसरतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शर्मिला टागोर म्हणाली, तैमूर अजून खूप छोटा आहे. परंतु ७-८ वर्षांचा होईल तेव्हा मात्र तो इतका प्रसिद्ध राहणार नाही. जेव्हा तो इतका मोठा होतो की तो सोशल मीडिया हाताळेल, तेव्हा हे सर्व  पाहून तो आश्चर्यचकित होईल, असे त्यांनी सांगितले.

परंतु, जेव्हा विराट आणि अनुष्काला मूल होईल. तेव्हा मग कदाचित तैमूरला लोक विसरतील. यावर करिनाने तातडीने हो, मलाही अशी आशा आहे, असे म्हंटले.

नुकताच सैफ, करीना, तैमूर, कुणाल खेमू, सोहा अली खान आणि इनाया शर्मिला टागोर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रणथंभोरमध्ये भेटले. या सर्वांचा कौटुंबिक फोटोही बर्‍यापैकी व्हायरल झाले होते.

 

View this post on Instagram

 

Cuties #sharmilatagore #sohaalikhan #saifalikhan #kareenakapoor

A post shared by Sharmila tagore Pataudi (@sharmilatagoreofficial) on

Leave A Reply

Your email address will not be published.