इम्फाळ : मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यात एका फुटबॉल सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडू हातात असॉल्ट रायफल घेऊन फुटबॉल खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये असॉल्ट रायफल घेऊन फुटबॉल खेळणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये, फुटबॉल किट परिधान केलेले एक १२ पुरुष एके आणि अमेरिकन मूळ असलेल्या एम सीरीजच्या असॉल्ट रायफल्स हातात घेऊन फुटबॉलला लाथ मारताना दिसत आहेत. रायफल्सच्या बॅरलभोवती लाल फिती बांधल्या आहेत.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कार्यक्रमाच्या पोस्टरमध्ये नोहजांग किपगेन मेमोरियल प्लेग्राउंड, कगमनोम्फाही असे ठिकाण आहे. मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यात एक गाव आहे जे स्थानिक लोक ‘गमनोम्फाई’ म्हणून ओळखतात, जे राज्याची राजधानी इम्फाळपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे.