राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – जनतेला विकास हवा, प्रलोभन नको, असे प्रतिपादन खेड-आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जनसंवाद दौर्यामध्ये टाकळकरवाडी (ता. खेड) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व करण्यात आले त्यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमासाठी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा कांचन ढमाले, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, तालुका महिला अध्यक्षा संध्या जाधव, जिल्हा परिषद माजी सदस्या मंगल चांभारे,
खेड बाजार समितीचे अध्यक्ष कैलास लिंभोरे, माजी अध्यक्ष शांताराम चव्हाण, राजगुरूनगर सहकारी बँकेचे संचालक विनायक घुमटकर, माजी संचालक हेमलता टाकळकर, बाजार समितीचे संचालक जयशिंग भोगाडे, हनुमंत कड, पप्पू टोपे, रणजित गाडे, कमल कड,
युवक तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर, पंचायत समितीचे माजी सभापती अरुण चौधरी, सुरेश शिंदे, माजी उपसभापती सतीश राक्षे, वैशाली जाधव, अॅड. मनीषा टाकळकर, सरपंच सुजाता टाकळकर, कारभारी टाकळकर, राजेंद्र टाकळकर, राजाराम टाकळकर, हेमलता टाकळकर, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, मी काम करणार माणूस आहे. आतापर्यंत टाकळकरवाडीसाठी विकास केला, जास्तीचा निधी दिला.
माझ्याकडून परीक्षा घेतली आहे. आता तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे उद्याच्या नोव्हेंबरमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीतून तुम्ही ते दाखवून द्याल असा विश्वास आहे
विकासासाठी ग्रामस्थ योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास टाकळकर यांनी तर गीताराम टाकळकर यांनी आभार मानले
भावभक्तीने देव गावातही भेटतो
भावभक्तीने देव गावातही भेटतो. भाव भक्तीने पांडुरंग कडूस येथे आला ही तालुक्यातील घटना आहे. म्हणूनच देव दर्शनासाठी दूर जाण्याची गरज नाही. भावभक्तीने देव गावात भेटतो. दानधर्म आणि देवधर्म केल्याने देव भेटतो.
मात्र देवधर्म दुसर्याच्या पैशाने केला तर तो लाभत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी देव दर्शन घडविणार्या आणि महिलांना साड्या वाटप करणार्याला बाजूला ठेवून, विकासाच्या मागे उभे राहा, असे आवाहन मोहिते पाटील यांनी केले.
विकासाची गंगा अंगणी
जनसंवाद दौर्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून टाकळकरवाडी(9 कोटी 69 लाख), मांजरेवाडी(2 कोटी 48 लाख), होलेवाडी (10 कोटी 79 लाख), राक्षेवाडी(1 कोटी 82 लाख),
ढोरेभांबुरवाडी (2 कोटी 65 लाख),वरची भांबुरवाडी (10 कोटी 22 लाख ), तुकाईवाडी (1 कोटी 51 लाख) आणि जैदवाडी 21 कोटी 25 लाख) या कोटयावधी रुपयांच्या विकास कामाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन व उदघाटन करण्यात आली यावेळी आमदारांनी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.