मुंबई – बॉलिवूडचा रिअल बागी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ टायगरला बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्ह्णून ओळखले जाते.
डॅड ‘जॅकी श्रॉफ’ यांच्या पावलावर पाऊल टाकत टायगर बॉलिवूडमध्ये आला. साजिद नाडियाडवाला यांच्या ‘हिरोपंती’ चित्रपटातून टायगरने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलीवूडमधील नेपोटिझम वॉर सुरू झाले आहे. अनेक स्टार किड्सवर जोरदार टीका होत आहे. अनेक नामांकित कलाकारही घराणेशाहीमुळे आलेले भले- बुरे अनुभव शेअर करताना दिसत आहेत. या चर्चेत आता अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ने आपल मत सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.
जॅकी श्रॉफ यांचा मुलगा असल्यामुळे आणि एक स्टारकिड असल्यामुळे कायम माझ्यावर काम करताना दबाव होता. लोकांना वाटतं की स्टारकिड असणं सहज-सोपं काम आहे. पण, तसं प्रत्यक्षात नसतं. मी खोटं सांगणा नाही, पण सतत डोक्यात हा विचार घोळत असतो. जे स्टाककिड आहेत आणि त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे, त्यांच्यासाठी हे सारं सोपं आहे. मीदेखील माझ्या वडिलांच्या छत्रछायेतून मी बाहेर पडलो”, असं टायगर म्हणाला.
पुढे तो म्हणतो, “माझ्या वडिलांनी जवळपास ३० वर्ष या क्षेत्रात काम केलं आहे. त्यांनी करिअरमध्ये येणारे चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळेच त्यांनी मला कायम सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला.माझ्यावर काही मीम्सदेखील तयार होता आणि लोक मला ट्रोलही करतात. मात्र या सगळ्याकडे मी सकारात्मकतेने पाहतो. मला राग किंवा वाईट वाटत नाही. मी ते मीम्स एन्जॉय करतो”. असं तो म्हणाला आहे.