सातारा, (प्रतिनिधी) – सातारा शहरासह संपूर्ण सातारा-जावळी मतदारसंघात विकासात्मक कायापालट झालेला आहे. या मतदारसंघात कुठेही जावा अगदी दुर्गम भागात जावा, तिथे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट झाला आहे.
त्यामुळे विरोधक कोणीही असला तरी, जनता फक्त शिवेंद्रसिंहराजेंच्याच पाठीशी भक्कमपणे उभी आहे. जनतेने आपले आशीर्वाद कायम ठेवून शिवेंद्रसिंहराजेंना आपली सेवा करण्याची संधी पुन्हा द्यावी, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. सातारा शहरासह सातारा व जावळी मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रचारार्थ वेदांतिकाराजे यांचा सातारा शहरासह सातारा व जावळीतील ग्रामीण भागात प्रचार दौरा उत्साहात झाला.
याप्रसंगी त्यांनी नागरिक, ग्रामस्थ आणि महिलांशी संवाद साधून विकासकामांबाबत चर्चा केली. आ. शिवेंद्रसिंहराजे प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. सातारा-जावळी मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मतदारसंघाचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा, वाडी, वस्तीचा कायापालट झाला आहे. जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याला ते नेहमीच प्राधान्य देतात.
यामुळे संपूर्ण जनता त्यांच्यावर प्रेम करते. आपली सेवा करण्यासाठी मतदारसंघातील विकासपर्व कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि त्यांना विक्रमी मतांनी विजयी करावे असे आवाहन, सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी केले.
Remarks :
सातारा