नवी दिल्ली – “घरात ‘बीफ’ आढळले म्हणून गेल्या सात वर्षांत अनेकांना झुंडशाहीचे बळी व्हावे लागले. भाजपप्रणीत मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील अनेक राज्यात गोमांस व गाईंची वाहतूक केल्याच्या कारणावरून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती आहेत असे असतांना दुसरीकडे मात्र गोमांस खाण्यास मेघालयमधील भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुल्लई यांनी लोकांना प्रोत्साहन दिलं आहे. सनबोर शुल्लई यांनी गेल्याच आठवड्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.
ते म्हणाले, चिकन, मटण आणि माशांपेक्षा गोमांस जास्त खावं यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. भाजप गोहत्या रोखणारा पक्ष असल्याची अल्पसंख्याक समाजाच्या मनातील धारणा दूर होईल, असं राज्य सरकारमध्ये पशुपालन मंत्री असलेले सनबोर शुल्लई यांनी म्हटलं.
दरम्यान,’गोमांस अधिक खावं या साठी मी नेहमी सकारात्मक असून लोकांना सुद्धा प्रोत्साहन देतो. चिकन, मटन आणि माशांपेक्षा गोमांस लोकांनी अधिक खावे. असे सांगतोय कारण लोकांना भाजप पक्ष गोमांस, गोहत्येला प्रतिबंध करणारा पक्ष आहे असा गैरसमज आहे. तो यामुळे दूर होईल.’