सणसरमध्ये श्री छत्रपती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप
भवानीनगर – सर्वसामान्य जनतेसाठी माणूस काम करत राहिला तर जनता कधीही त्या व्यक्तीला विसरू शकत नाही. त्याचप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांचे योगदान मोठे असल्याने व सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून विकासाची दिशा दिली. त्यामुळेच विकासाची दिशा कायम ठेवणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा केला जातो, असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सागर भोईटे मित्र परिवाराच्यावतीने श्री छत्रपती हायस्कूल सणसरच्या एकूण 375 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी बारामती ऍग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार व आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
यावेळी श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, विजयसिंह निंबाळकर, संजय निंबाळकर, शीलादेवी निंबाळकर, संचालक रणजीत निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, सणसर सोसायटीचे अध्यक्ष परशुराम रायते,
अशोक काळे, हेमंत निंबाळकर, राष्ट्रवादी युवकचे नितीन निंबाळकर, राष्ट्रवादी युवक इंदापूर तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, विजय पाटील, विक्रम निंबाळकर, वसंतराव जगताप, अभयसिंह निंबाळकर, पार्थ निंबाळकर, यशवंत नरुटे, नेताजी गायकवाड, प्राचार्य रमेश मचाले, मुख्याध्यापक सुनील सर्जे, लक्ष्मण गिरीगोसावी आदी उपस्थित होते.