लोक समानतेच्या गोष्टी करतात, परंतु समाजात बदल पाहू शकत नाही – मिमी

नवी दिल्ली – संसदेत पाश्चिमात्य कपडे परिधान केल्याने तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या. यावर आता मिमी चक्रवर्ती सडेतोड ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. मी जास्त बोलण्यात नाहीतर करून दाखविण्यात विश्वास ठेवते, असे त्यांनी म्हंटले आहे. शिवाय असा लोकांकडे करण्यासाठी काहीच नसते, असेही मिमी चक्रवर्ती यांनी म्हंटले.

मिमी चक्रवर्ती म्हणाल्या कि, एक महिला खासदारांचे कपड्यांचा विषय वादाचे कारण बनू शकते. तर महिला सशक्तीकरणाच्या सर्व गोष्टी अर्थहीन आहेत. लोक केवळ समानतेच्या गोष्टी करणे पसंत करतात. परंतु,समाजात बदलाव पाहणे मुश्किल आहे. त्या पुढे म्हणाल्या, २०१९ मध्ये संसदेत महिलांची संख्या अधिक असल्याचा आनंद आहे. आम्ही ३३ टक्के महिला प्रतिनिधित्वाची लढाई सुरूच ठेवणार आहोत, असे मिमी यांनी सांगितले.

दरम्यान, चित्रपटातून राजकारणात प्रवेश केलेल्या मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांना बंगाली जनतेने आपला कौल दिला. मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांनी संसदेत पाश्चिमात्य कपडे परिधान करून फोटो काढले. यावरून त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले. परंतु, दुसरीकडे अनेकांनी नवीन टर्न्डचे स्वागतही केले.

Leave A Reply

Your email address will not be published.