लोक आता भाजपचा खरा चेहरा पाहू शकतात- जयंत पाटील

मुंबई: महात्मा गांधींचा खून केलेल्या नथुराम गोडसेचा भाजप उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी बचाव केला आहे आणि त्याला देशभक्त म्हणून संबोधले जात आहे. आता लोक भाजपला खरा चेहरा पाहू शकतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यापूर्वी देखील त्यांनी २६/११ आतंकवादी हल्ल्यात लढताना शहिद झालेले हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. चौफेर टीकेनंतर त्यांनी माफी मांगितली होती.

साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरने आज एका माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना, “नथुराम गोडसे ‘देशभक्त’ होते, ते ‘देशभक्त’ आहेत आणि ते ‘देशभक्तच’ राहतील. जे लोक नथुराम गोडसेंना आतंकवादी म्हणतात त्यांनी आत्मचिंतन करायला हवं, अशा लोकांना या निवडणुकीत जनतेकडून योग्य उत्तर देण्यात येईल, असे विधान केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.