या दिवाळीच्या निमित्ताने मानुषी छिल्लरला आपल्या घरी जाण्याची संधी मिळाली. तब्बल आठ महिन्यांनंतर आई डॉ. नीलम छिल्लर यांची भेट घेता आल्यामुळे मानुषी खूप खुशीत आहे. कोविड-19 च्या साथीदरम्यान मानुषीची आई दिल्लीमध्ये करोना रुग्णांवरील उपचाराच्या कामात व्यस्त होती.
View this post on Instagram
दिवाळीच्या निमित्ताने त्या दिल्लीवरून मुंबईला परत आल्या आहेत. ही भेट आपल्यासाठी खूपच स्पेशल असल्याचे मानुषीने म्हटले आहे. तिच्याच शब्दात सांगयचे तर ही दिवाळी तिच्यासाठी आणि तिच्या परिवारासाठीही “सुपर स्पेशल’ आहे.
View this post on Instagram
करोना रुग्णांवरील उपचारात व्यस्त असलेल्या आईशी दररोज व्हिडिओ कॉलद्वारे जरी बोलणे होत असले तरी या काळात या दोघींची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. आईसाठी तिचे कर्तव्य अधिक महत्त्वाचे होते. त्यामुळे आईचा आपल्याला विशेष अभिमान वाटत असल्याचेही मानुषीने म्हटले आहे.
View this post on Instagram
पण आता दोघींची भेट झाली आहे. दिवाळी आपल्या कुटुंबीयांसमवेत आणि मित्र मंडळींसमवेतच साजरी करायला पाहिजे. माझ्या घरचे सर्वचजण माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत.
View this post on Instagram
दिवाळी म्हणजे निस्वार्थ प्रेमासाठी आभार व्यक्त करण्याची संधी आहे. गेल्या आठ महिन्यांपासून घरच्यांची भेट झाली नव्हती. म्हणून देखील ही दिवाळी आपल्यासाठी खूपच स्पेशल आहे, असे मानुषीने म्हटले आहे.
View this post on Instagram