जनतेला ठाकरे सरकारचा कंटाळा आलाय

मुंबई – राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचातय निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. या निकालानंतर सर्वच पक्षांकडून आमच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात भाजपच सर्वाच मोठा पक्ष ठरल्याच्या दावा  भाजप नेते नारायण राणे  यांनी केले आहे.

ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘येत्या निवडणुकांमध्ये भाजपच बाजी मारेल. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादीत केलं त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो. मविआ सरकारवरून  लोकांचा विश्वास उडाला आहे. जनतेला ठाकरे सरकारचा कंटाळा आला आहे.  सरकारच्या काळात भ्रष्टाचारही वाढू लागला आहे.  असं म्हणत त्यांनी पुढे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत रोकठोक सवाल केले आहे की, उद्धव ठाकरेंनी समजावून सांगावं राज्यातल्या तिजोरीत किती पैसे आहेत, राज्याची अर्थव्यवस्था काय आहे?  असा म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. 

दरम्यान, राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचातय निवडणुकीचा निकालानंतर सर्वच पक्षांकडून आमच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.