मुंबई – वेब सीरिजचे सध्या जणू काही उधाण आले आहे. अनेक विषय याद्वारे सर्वांपर्यंत पोहचवण्याचे काम वेब सीरिजद्वारे केले जाते. आता एका राजकीय पक्षानेही यामध्ये पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक नवी कोरी वेब सीरिज लाँच केली आहे. ‘पेंग्विन गेम्स’ असे या वेब सीरिजचे नाव आहे.
‘पेंग्विन गेम्स’ वेब सीरिजद्वारे मनसेने वरळीतील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. फेसबुकवर सुरू करण्यात आलेल्या या वेब सीरिजच्या पहिल्या भागात वरळी भागात असलेल्या प्रेम नगर येथील पाणी प्रश्न आणि सॅनिटायझेनची बिकट अवस्था मांडली आहे.
दर पंधरा दिवसांनी या वेब सीरिजचा एक भाग प्रदर्शित केला जाणार आहे. याचे प्रसारण सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जाईल.
दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये वरळीतून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना विजय मिळाला होता.