पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे विनामास्क आणि रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल 66 हजार रुपये दंड वसूल केला. ही कारवाई येथून पुढे बोर्ड प्रशासनातर्फे आणखीन कडक करण्यात येणार आहे.
शहर आणि जिल्ह्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बोर्डातर्फे लॉकडाऊन कालावधीपासूनच कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात या कारवाईअंतर्गत महिन्याला साधारण 55 ते 60 हजार दंड वसूल होत आहे.
परंतु, सद्य:स्थितीत आठ दिवसांत केलेल्या कारवाईत बोर्डाने 66 हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईमुळे किती नागरिक नियमांचे पालन करत आहेत किंवा नाही हे स्पष्ट झाले आहे. येथून पुढेही मास्क न वापरणारे, रस्त्यावर थुंकणारे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे बोर्डाचे जॉईंट सीईओ राहूल गजभिये यांनी सांगितले.