मुंबई – रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बॅंकेने काही प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट जारी करणाऱ्या कंपन्यावर दंड लावण्याची कारवाई केली आहे.
रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार वोडाफोन एम पैसाला 3.05 कोटी रुपयांचा, फोन पेला एक कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाय-कॅश सॉफ्टवेअर सोल्यूशनला पाच लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. वेस्टर्न युनियन फायनान्स सर्व्हिसेस आणि मनी ग्रॅम पेमेंट सिस्टम या कंपन्यांना दंड करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.