#ICCWorldCup2019 : आर्चर, रॉय, सर्फराज यांना दंड

लंडन – इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि फलंदाज जेसन रॉय यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान अनुक्रमे पंचांच्या निर्णयावर नाराजी प्रकट केल्याबद्दल आणि अपशब्दाचा वापर केल्याबद्दल त्यांच्यावर सामन्यातील मानधनाच्या 15 टक्के दंड आकारण्यात आला आहे.

तर, दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद यानेही षटकांची गती योग्य न राखल्याबद्दल त्याला 20 टक्के तर त्याच्या संघसहकाऱ्यांना 10 टक्के दंड आकारला गेला आहे.

रॉयने आयसीसीच्या आचारसंहितेतील 2.3 या कलमाचा भंग केल्याचे दिसले आहे. त्याने 14व्या षटकात सदोष क्षेत्ररक्षण केल्यानंतर अपशब्द वापरले. ते पंचांनी ऐकले. तर आर्चरने पंचांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याबद्दल त्यांना ही शिक्षा झाली आहे. या सर्व खेळाडूंनी आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.