मुंबई : लक्झेम्बर्गच्या भारतातील राजदूत पेगी फ्रँझेन (Peggy Frantzen) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
लक्झेम्बर्ग आणि भारतातील संबंध व सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.यावेळी लक्झेम्बर्गचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत पर्सिस बिलिमोरिया तसेच कॉन्सिलर स्टीव्ह हॉशे उपस्थित होते.