नवी दिल्ली – पेगॅसस हेरगिरीवरून देशातील राजकारण तापलेले असतानाच “द वायर’च्या कार्यालयाची पोलिसांकडून आज झाडाझडती घेण्यात आली. ही चौकशी नियमीत तपासणीचा भाग असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले.
जगभरातील 16 मीडिया संस्थांपैकी “द वायर’ ही एक संस्था आहे, जी स्पायवेअरद्वारे लक्ष्यित केलेल्या संख्येच्या डेटाबेसवर आधारित फ्रेंच भागीदारीत काम करीत आहे.
दिल्लीचे डीसीपी दीपक यादव म्हणाले की, राजधानी दिल्लीत स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर नियमित तपासणी चालू आहे. याचाच एक भाग म्हणून “द वायर’ कार्यालयात जावून चौकशी करण्यात आली. स्वातंत्र्य दिनापर्यंत संपूर्ण दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था आणि दहशतवादविरोधी उपाय जसे भाडेकरू पडताळणी, गेस्ट हाऊसची तपासणी करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
दिल्ली-एनसीआरमध्ये बहुस्तरीय व्यवस्था आणि सीमांवर कडक पहारा ठेवून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. याशिवाय एनएसजी, एसपीजी आणि आयटीबीपीसारख्या एजन्सींना हाय अलर्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, दैनिक भास्कर कार्यालयावर गुरुवारी छापे टाकत कारवाई करण्यात आली होती. यामुळे “द वायर’ची पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीमुळे राजनाधीत चांगलीच चर्चा रंगली आहे.
Not just another day at the office for @thewire_in after #PegasusProject
Policeman arrived today with inane inquiries. 'Who's Vinod Dua?' 'Who's Swara Bhaskar?' 'Can I see your rent agreement?' 'Can I speak to Arfa?'
Asked why he'd come: "Routine check for Aug 15"
Strange. pic.twitter.com/jk0a2dDIuS
— Siddharth (@svaradarajan) July 23, 2021