पुणे: जपानी भाषा शिक्षण संघटना, पुणे यांच्या तर्फे, निहोनजिंकाई आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्यदूत यांच्या समन्वयाने आयोजित ३६ व्या जपानी भाषा भाषण स्पर्धेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागातील कनका देवेंद्र पेडणेकर यांनी वरिष्ठ श्रेणीत प्रथम पारितोषिक (पश्चिम विभागातून) मिळविले.
हे पारितोषिक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागासाठी अभिमानाचा क्षण आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक आणि कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी जपानी भाषा विभाग व पेडणेकर यांचे अभिनंदन केले.