फलटण – फलटण ते साखरवाडी रस्त्यावर पिंपळवाडी गावच्या हद्दीत पिकअपने ठोकरल्याने राहुल उर्फ आप्पा अंकुश ठोंबरे (वय 28, रा. तांबेवस्ती, पिंपळवाडी) या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
बुधवारी दि. 27 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास फलटण ते साखरवाडी रस्त्यावर पिंपळवाडी हद्दीत आप्पा ठोंबरे तरकारी गाडी आली का, हे पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेने चालले असताना फलटण बाजूने भरधाव वेगात आलेल्या पिकअपने (एमएच 16 एवाय 5987) त्यांना समोरुन जोरदार धडक दिली.
ही धडक एवढी जोरदार होती की आप्पा ठोंबरे जागीच मरण पावले. पिकअप चालक निलेश विश्वास नरुटे (रा. जोशी वस्ती, साखरवाडी) असून याबाबतची फिर्याद लालासाहेब बापू ठोंबरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.