पिंपरी-चिंचवड | शहरात आज नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

दिवसभरात नवे 419 कोरोनाबाधित

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आज 419 कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली आहे. तर, नवीन 542 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत.  शहरातील आजपर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 50 हजार 153 तर एकूण कोरोनामुक्तांची संख्या ही 2 लाख 40 हजार 902 इतकी झाली आहे.

शहरात आज 5 हजार 446 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून शहरातील आजपर्यंतची चाचण्यांची एकूण संख्या 13 लाख 11 हजार 041 इतकी झाली आहे.

शहरातील सक्रीय रूग्णांची संख्या 5 हजार 205 इतकी असून 2 हजार 546 रूग्णांचा रूग्णालयामध्ये उपचार चालू आहे तर 2 हजार 659 रूग्ण होम क्वारंटाईन आहेत.

शहरात आज 20 कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह शहरात कोरोनामुळे मृतांची एकूण संख्या  4 हजार 046 इतकी झाली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.