पिंपरी -भीम संग्राम या सामाजिक संघटनेच्या वतीने शहरातील विविध समस्येबाबत तसेच कामांबाबत महापालिकेच्या विविध विभागातून माहिती अधिकाराखाली माहिती मागविण्यात आली होती मात्र ही माहिती देण्यास पालिकेचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे निवेदन राहूल वडमारे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, महापालिकेतील स्थापत्य विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, लेखा विभाग आदी विभागात माहिती अधिकाराद्वारे माहिती मागवली असता यावर चुकिची माहिती दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर, निवेदन दिल्यावर काय कारवाई झाली? याबाबत विचारणा केली असता उडवा-उडवीचे उत्तरे दिली.