कामगार पिळवणूक प्रकरणी ठेकेदारांची उलटतपासणी

पिंपरी – रस्ते साफसफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदारांची उलट तपासणी करण्याचे आदेश महापालिकेने काढले असून प्रभाग अधिकारी ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

साफ सफाई कामगरांची ठेकेदाराकडून पिळवणूक होऊ नये यासाठी 2018 सालापासून महापालिकेने सुधारीत निवीदा प्रक्रीया राबवल्या होत्या. शहरात एकूण दिड हजार कामगार रस्ते साफसफाइचे काम करतात. 2018च्या नियमानुसार संबंधीत कामगारांना किमान वेतन हे 16 हजार 600 रुपये एवढे असावे, त्यातून पीएफ, व्यवसाय कर, सानुग्रह अनुदान एशी 4 हजार 960 रुपयांची कपात करुन उर्वरीत पगार कामगारांना देण्यात यावी. मात्र प्रत्यक्षात असे होत नसल्याच्या तक्रारी कामगारांनी केल्या आहेत.

ठेकेदार हा कामगारांचे एटीएम कार्ड, पासबुक त्याच्या जवळच ठेवत असल्याचे समोर आले. तो परस्पर कामगारांच्या खात्यातून पैसे काढत असल्याचे समोर आले. प्रकऱणांचे गांभीर्य पाहता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.