महापालिका अधिकाऱ्यांचा दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी एका महिन्याच्या मानधनातून आषाढीवारीतील दिंड्यांना मृदुंग भेटवस्तू देण्याबरोबरच दुष्काळग्रस्तांसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महापालिका आस्थापनेवरील सर्व राजपत्रित अधिकारी देखील जून महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने तसा अध्यादेश काढला आहे. सर्व महापालिकांच्या आयुक्‍तांना त्याचे पालन करण्याचा आदेश दिला आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती भयानक आहे. मॉन्सूनचे आगमन लांबल्याने त्यात आणखी भर पडली आहे.

दरम्यान, आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना कोणतीही भेटवस्तू न देण्याची सूचना दोन्ही दिंडी सोहळ्यातील मानकऱ्यांनी केली होती. त्यावर महापालिका पदाधिकाऱ्यांची सहमती झाली होती. हा निधी दुष्काळग्रस्तांना देण्याचे जाहीर केले होते. मात्र, दिंड्यांना भेटवस्तू न देण्याची परंपरा खंडीत होत असल्याची जाणीव होताच, या निर्णयावर “यू टर्न’ घेत सर्व नगरसेवकांच्या एका महिन्याच्या मानधनाच्या रकमेतून दिंड्यांना मृदुंग भेट देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर राहिला प्रश्‍न दुष्काळग्रस्त भागाला आर्थिक मदत करण्याचा. त्यानंतर महापालिका पदाधिकाऱ्यांच्या मानधनातूनच दुष्काळनिधी देण्याचे महापौर राहुल जाधव यांनी जाहीर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.